‘मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट’ – अमृता फडणवीस

‘मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे अनेक जोडप्यांचे घटस्फोट होतात’, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत भाजपातर्फे आयोजित केलेल्या कॅन्सरमुक्त अभियानाचा अमृता फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी अमृता फडणवीस यांनी मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यावरून नाराजी व्यक्त करत राज्य सरकारवर टोला लगावला आहे. अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मुंबईतील वाहतूक कोंडी घटस्फोटासाठी कारणीभूत […]

‘मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट’ – अमृता फडणवीस

‘मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे अनेक जोडप्यांचे घटस्फोट होतात’, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत भाजपातर्फे आयोजित केलेल्या कॅन्सरमुक्त अभियानाचा अमृता फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी अमृता फडणवीस यांनी मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यावरून नाराजी व्यक्त करत राज्य सरकारवर टोला लगावला आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मुंबईतील वाहतूक कोंडी घटस्फोटासाठी कारणीभूत ठरत आहे. मी एक सामान्य नागरिक म्हणून बोलत आहे. मी बाहेर निघते तेव्हा मला किती वाहतूक कोंडी होते हे दिसते, खड्ड्यांनी आम्हाला किती त्रास होतो हे दिसत आहे. मी एका सामान्य स्त्रीप्रमाणे बाहेर पडत असते, असे सांगत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.’ तसेच त्या म्हणाल्या, ‘मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होण्याचे प्रमाण तीन टक्के आहे. कारण ते आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही.’

अमृता फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, मामींनी एक नवीन शोध लावला आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत कसले बौद्धिक चालते माहिती नाही. पण एकदा असे बौद्धिकाचे सत्र अमृता फडणवीस यांच्यासाठी ठेवावे. कधीतरी मामीलाही बोलवा, असा टोला मनिषा कायंदे यांनी टोला लगावला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number