Delhi AQI : दिल्लीकरांचा श्वास गुदमरतोय! इंडिया गेटवर AQI 235 पार; दिल्ली सरकारला सतावतेयं वाढत्या प्रदुषणाची चिंता

IMD ने पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरी तापमान वाढीची शक्यता कायम आहे.

Delhi AQI : दिल्लीकरांचा श्वास गुदमरतोय! इंडिया गेटवर AQI 235 पार; दिल्ली सरकारला सतावतेयं वाढत्या प्रदुषणाची चिंता

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील वायूगुणवत्ता पुन्हा चिंतेचा विषय ठरली आहे. इंडिया गेट आणि कर्तव्य पथ परिसरातील हवेचा दर्जा निर्देशांक (Air Quality Inde, AQI) 235 नोंदवण्यात आला असून तो ‘निकृष्ट’ श्रेणीत मोडतो, अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Central Pollution Control Board, CPCB) दिली आहे. या पातळीवरील प्रदूषणामुळे श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीतील हवेची तुलना ‘गॅस चेंबर’शी करत टीका केली. त्यांनी म्हटले की, वेगवान विकासकामांनंतरही उत्तर प्रदेशातील नागरिक स्वच्छ वातावरणाचा लाभ घेत आहेत आणि ते ‘गुदमरलेले’ नाहीत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणातही चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: Raigad Fort Ropeway : शिवजयंतीनंतर रायगड किल्ल्यावरील रोप-वे सेवा बंद; आता होळीनंतरच रायगडावर रोप-वे जाणार

हवामानाच्या दृष्टीने काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department, IMD) 16 फेब्रुवारीपासून उत्तर भारतातील काही भागांत पावसासह मेघगर्जनेचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, या बदलांचा दिल्लीतील तापमानावर मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात दिल्लीचे कमाल तापमान सरासरी 25 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे दीर्घकालीन सरासरीपेक्षा (Long Period Average, LPA) 1.9 अंशांनी जास्त आहे. पुढील काही दिवसांत कमाल तापमान हळूहळू वाढत 30 अंश सेल्सिअसच्या जवळ जाण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने सक्रिय पश्चिमी विक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बन्स) येण्याचा अंदाज व्यक्त केला असला, तरी तापमानात लक्षणीय घट होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे प्रदूषण आणि उष्णता या दुहेरी आव्हानांचा सामना दिल्लीकरांना पुढील काही दिवस करावा लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: CBSE Board Exams 2026 : ऑल दी बेस्ट! आजपासून CBSE बोर्ड परीक्षेला सुरुवात; देशभरातून 45 लाख विद्यार्थी बसणार परीक्षेला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number