देबाशिष चक्रवर्ती राज्याचे मुख्य सचिवपदी

राज्याचे मुख्य सचिव सीतारा कुंटे यांचा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने फेटाळला आहे. त्यामुळे सीताराम कुंटे यांच्या प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्यामुळे देबाशिष चक्रवर्ती यांची मुख्य सचिव पदी निवड झाली आहे. सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर रोजी संपणार असल्यामुळे राज्य सरकारने त्यांना ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सीताराम कुंटे यांच्या […]

देबाशिष चक्रवर्ती राज्याचे मुख्य सचिवपदी

राज्याचे मुख्य सचिव सीतारा कुंटे यांचा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने फेटाळला आहे. त्यामुळे सीताराम कुंटे यांच्या प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्यामुळे देबाशिष चक्रवर्ती यांची मुख्य सचिव पदी निवड झाली आहे.

सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर रोजी संपणार असल्यामुळे राज्य सरकारने त्यांना ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सीताराम कुंटे यांच्या तीन महिने सेवावाढीचा प्रस्ताव केंद्राने नाकारला असून त्यांच्या जागी देबाशिष चक्रवर्ती मुख्य सचिव म्हणून कार्यरत राहणार आहेत.

मुख्य सचिव पदी वंदना कृष्णा, देवाशिष चक्रवर्ती, मनुकुमार श्रीवास्तव, सुजाता सौनिक यांची नावे चर्चेत आली होती. मात्र अखेर केंद्राने सीताराम कुंटे यांचा मुदतवाढीचा प्रस्ताव फेटाळला असून त्यांच्या जागी दोबाशिष चक्रवर्ती यांची वर्णी झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number