मुंबई, १२ जुलै २०२३, प्रतिनिधी : पावसाळ्यात गरमा गरम भाजी तर आपण खातोच. पण या पावसाळ्यात काही नवीन पदार्थ खायला तुम्हाला आवडेल का ? तर पावसाळ्याच्या या अल्हाददायक वातावरणात गरमागरम डाळ कचोरी नक्की खाऊन पहा. आता ही डाळ कचोरी कशी तयार करावी ? ते जाणून घेऊया :
मैदा – 2 कप
तेल – 4 ते 5 चमचे
तूप – 2 चमचे
भिजवलेली उडीद डाळ – 1 वाटी
कसुरी मेथी पावडर – 2 टीस्पून
लाल तिखट – 1 चमचा
जिरे पावडर – 2 चमचे
धने पावडर – 2 चमचे
बडीशेप – 2 चमचे
ओवा – 2 चमचे
हिरवी मिरची – 2 तुकडे
बेकिंग सोडा – अर्धा चमचा
हिंग – चवीनुसार
मीठ – चवीनुसार
– सर्वात प्रथम एक पातेले घ्या. त्यात मैदा , मीठ आणि तुप टाकून त्यात पाणी टाकून हे एकत्र मिसळून घ्या.
– हे मिश्रण काही वेळ झाकून ठेवा. आता उडीद डाळीची पेस्ट बनवून घ्या.
– आता एका तव्यात तेल गरम करत ठेवा.
– तेल गरम झाले की, त्यात ओवा आणि उडीदाच्या डाळीची पेस्ट टाका.
– त्यात लाल तिखट , जिरे पावडर , धने पावडर , बडीशेप , मीठ आणि बेकिंग सोडा मिसळा.
– या सगळ्या गोष्टी नीट एकत्र केल्यानंतर त्यात थोडे पाणी मिसळा.
– मसाला चांगला शिजल्यानंतर तो थंड होण्याकरता थोडा वेळ बाजूला ठेवा आणि सारण बनवायला घ्या.
– मैद्याचे लहान लहान गोळे बनवून घ्या. या गोळ्यात एक चमचा सारण भरा आणि या गोळ्यांना कचोरीच्या आकारात बनवून घ्या.
– या कचोरीला गरम तेलात तळून घ्या.
– तयार झालेली कचोरी तुमच्या आवडत्या चटणीसोबत खा.