एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला

एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हा हल्ला करण्यात आला असून, ऑगस्ट २०११ ते ३ फेब्रवारी २०२१ या कालावधीतील ४५ लाख लोकांची माहिती लीक झाली असल्याचं एअर इंडियाकडून सांगण्यात आलं आहे. या माहितीत प्रवाशांच्या नावासह जन्मतारीख, संपर्क क्रमांक, पासपोर्टवरील माहिती, क्रेडिट कार्डची माहिती यासह इतर माहिती चोरली […]

एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला

एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हा हल्ला करण्यात आला असून, ऑगस्ट २०११ ते ३ फेब्रवारी २०२१ या कालावधीतील ४५ लाख लोकांची माहिती लीक झाली असल्याचं एअर इंडियाकडून सांगण्यात आलं आहे. या माहितीत प्रवाशांच्या नावासह जन्मतारीख, संपर्क क्रमांक, पासपोर्टवरील माहिती, क्रेडिट कार्डची माहिती यासह इतर माहिती चोरली गेली आहे.

एअर इंडियाच्या प्रवाशांची माहिती साठवण्यात आलेल्या एका डेटा सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ४५ लाख प्रवाशांची माहिती चौरीला गेली असून, एअर इंडियाने निवदेन प्रसिद्ध करून सायबर हल्ल्याची माहिती दिली आहे.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सीता या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला. ‘डेटा सर्व्हवर सायबर हल्ला झाल्याची माहिती प्रवासी सेवा पुरवठा प्रणालीकडून मिळाली आहे. सध्या कंपनी डेटा प्रोसेसर प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. आम्ही प्रवाशांना त्यांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड बदलण्यासाठी सांगत आहोत’, असं एअर इंडियाने म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number