आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबईतील विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्यांची रवानगी पुन्हा कोठडीत होणार आहे.
१०० कोटी रुपये वसुलीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. सोमवारी अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली असून न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी हा निर्णय दिला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना आजही दिलासा मिळालेला नाही.
अनिल देशमुखांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी असलेले पुरावे तसेच साक्षीदारांच्या विधानांमध्ये असलेला विरोधाभास त्यामुळे देशमुखांच्या जामीन अर्जावर विचार केला जाऊ शकत नाही, असे न्यायाधीश रोकडे यांनी सांगितले आहे.