मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपुर तालुक्यातील पळासनेरजवळ काल रात्री सेंधवाकडे जाणाऱ्या एका कंटनरला शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे.
१० मार्च रोजी रात्री उशीरा शिरपुरकडून सेंधवाकडे एचआर ३८ डब्लूएस ५१२९ क्रमांकाचे कंटेनर पळासनेर जवळून आत असताना शॉर्ट सर्किटमुळे अचानक कॅबिनला आग लागली. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला उभे करून सहचालकासह बाहेर उडी मारली. माहिती मिळताच महामार्ग पोलीस व शिरपूर येथील अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाकडून रात्री उशीरा आग विझवण्याचे काम सुरू झाले. मात्र, सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.