उदयपूर येथे काँग्रेसच्या झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या आधारावर महाराष्ट्रातही दोन दिवसांच्या राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १ आणि २ जून रोजी नाशिकमधील शिर्डी येथे काँग्रेसच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
काँग्रेसच्या या शिबिराला राज्यातील मंत्री, जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. उदयपूरच्या नवसंकल्प शिबिरातील सर्व मुद्दे राज्यातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवले जातील, अशी माहिती काँग्रेस पक्षप्रभारी एच. के. पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.
टिळक भवन येथे नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विस्तारीत कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक बडे नेते उपस्थित होते. यावेळी नाना पटोले म्हणाले, उदयपूरच्या नवसंकल्प शिबिराच्या घोषणापत्राची अंमलबाजवणी करतानाच केंद्र सरकाने ८ वर्षांपासून सुरू केलेल्या कारभाराची पोलखोल काँग्रेस पक्ष करणार आहे. तसेच भाजपा सरकारच्या काळातील जनतेच्या अनेक प्रश्नांवर भाजप कशी अपयशी ठरली हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी केले पाहिजे, असे ते म्हणाले.