एसटी संपामुळे परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे हाल

राज्यात आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सुरू झाली. मात्र, राज्यात सुरू असलेल्या एसटी संपामुळे बारावीच्या परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत. राज्यातील एसटी बससेवा बंद असल्यामुळे बुलडाण्यात विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रांवर पोहचायला उशीर झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर उशिराने लिहिण्यास मिळाला. राज्यातील एसटी संपामुळे बारावीच्या परिक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा उशिराने लिहिण्यास मिळाली. […]

एसटी संपामुळे परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे हाल

राज्यात आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सुरू झाली. मात्र, राज्यात सुरू असलेल्या एसटी संपामुळे बारावीच्या परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत. राज्यातील एसटी बससेवा बंद असल्यामुळे बुलडाण्यात विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रांवर पोहचायला उशीर झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर उशिराने लिहिण्यास मिळाला.

राज्यातील एसटी संपामुळे बारावीच्या परिक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा उशिराने लिहिण्यास मिळाली. तसेच अनेक विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घेत आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. तर परीक्षा झाल्यानंतरही अनेक विद्यार्थी ताटकाळत उभे होते. तसेच एसटी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

आजपासून बारावीची लेखी परीक्षा सुरू

कोरोना काळानंतर दोन वर्षांनी आजपासून बारावीची लेखी परीक्षा सुरू झाली आहे. ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान बारावीची लेखी परीक्षा होणार असून एकूण १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असून आरोग्याच्या दृष्टीने योग्य खबरदारी घेण्यात आली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर महाविद्यालय सज्ज झाले असून परीक्षेला येताना विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर वापरणे अनिवार्य आहे. तसेच एखादी विद्यार्थी आजारी असेल तर त्या विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालयात विलगीकरण कक्ष देखील असणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number