कर्नाटकमधील हिजाब प्रकरणावरून राजकारण तापले असून वाद निर्माण झाला आहे. तसेच याप्रकरणी अनेक राजकीय पक्ष, नेते प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गणवेशासंदर्भात महाविद्यालयांचे ठरलेले नियम पाळले गेले पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे म्हणाले, ‘शाळा आणि महाविद्यालयांसाठी गणवेश ठरवलेला असतो. आणि तो नियम पाळला गेला पाहिजे. शैक्षणिक केंद्रांवर केवळ शिक्षणावरच लक्ष दिले गेले पाहिजे. धार्मिक आणि राजकीय मुद्दे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये येता कामा नये’, असे ते म्हणाले.
कर्नाटकमधील उडपी येथील कुंदापूर परिसरातील एका महाविद्यालयामध्ये काही मुल्सीम धर्माच्या मुलींनी हिजाब घातल्यांना त्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश नाकारला होता. तसेच हिजाब घातलेल्या मुलींना वेगळ्या खोलीत बसण्यात सांगितले. ज्या वेळी या मुली महाविद्यालयाने ठरवलेल्या पोशाखात येतील तेव्हाच त्यांना वर्गात बसण्याची परवानगी देण्यात यील. तसेच हिजाब घालण्याचा हट्ट धरणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानंतर या विद्यार्थ्यींनी कर्नाटक न्यायालयात याचिका दाखल केली. हिजाब परिधान करून वर्गात बसू न देणे हे भारतीय राज्यघटनेच्या कलम १४ आणि २५ अंतर्गत देण्यात आलेया मलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असे या याचिकेत म्हटले आहे.