Cold Hands Feet: ऐन उन्हाळ्यातही हात-पाय बर्फासारखे गार पडत असतील तर सावधान; असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका

पचनशक्ती कमी असणेही या समस्येला कारणीभूत ठरते. अन्न नीट पचले नाही तर शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही.

Cold Hands Feet: ऐन उन्हाळ्यातही हात-पाय बर्फासारखे गार पडत असतील तर सावधान; असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका

हात-पाय नेहमी थंड राहणे किंवा सुन्न होणे ही साधी गोष्ट वाटली तरी ती शरीरातील काही अंतर्गत समस्येची चिन्हे असू शकतात. विशेषतः उन्हाळ्यात शरीर गरम असतानाही हात-पाय बर्फासारखे थंड वाटत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. हे शरीरातील संतुलन बिघडल्याचे संकेत मानले जातात.

रक्ताभिसरणाचा परिणाम

यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे रक्ताभिसरण (ब्लड सर्क्युलेशन) नीट न होणे. शरीरातील रक्त योग्य प्रकारे हात-पायांपर्यंत पोहोचत नसेल, तर त्या भागात थंडपणा जाणवते. रक्तच शरीराला उष्णता देण्याचे काम करते. त्यामुळे रक्तप्रवाह कमी झाला की हात-पाय थंड पडतात. यासोबतच शरीरातील अशक्तपणा आणि ऊर्जा कमी असणे हेही महत्त्वाचे कारण असू शकते.

पचनशक्ती आणि ताणतणाव

पचनशक्ती कमी असणेही या समस्येला कारणीभूत ठरते. अन्न नीट पचले नाही तर शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही. त्याचा थेट परिणाम हात-पायांवर दिसतो. ताणतणाव, मानसिक दबाव आणि थकवा यामुळेही शरीरातील संतुलन ढासळते आणि रक्तप्रवाहावर परिणाम होतो.

हेही वाचा: Gujarat Local Body Polls 2026: गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी, 'आप'ने उघडले खाते

संभाव्य आजाराचा धोका

जर ही समस्या दीर्घकाळ टिकून राहिली, तर ती रेनॉड्स रोग या विकाराचे लक्षण असू शकते. या अवस्थेत रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तप्रवाह अडथळला जातो. परिणामी हात-पायांमध्ये वेदना, मुंग्या येणे आणि काही वेळा शिरांशी संबंधित इतर समस्या निर्माण होऊ शकतात.

उपाय आणि काळजी

ही समस्या टाळण्यासाठी काही सोप्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. नियमित चालणे किंवा हलका व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते. हात-पाय थंड वाटत असतील तर हलक्या हाताने तेलाने मालिश करावी. यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि उष्णता टिकून राहते. याशिवाय आहाराकडे विशेष लक्ष देणेही महत्त्वाचे आहे. शरीरात आयर्न आणि जीवनसत्त्वांची कमतरता असेल, तर अशी समस्या अधिक जाणवू शकते. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या, फळे, सुकामेवा आणि पौष्टिक आहाराचा समावेश करणे आवश्यक आहे.

एकूणच, हात-पाय थंड राहणे ही किरकोळ समस्या नसून शरीराच्या आरोग्याबाबतचा इशारा असू शकतो. योग्य वेळी काळजी घेतल्यास आणि जीवनशैलीत बदल केल्यास ही समस्या सहज नियंत्रित करता येऊ शकते. 

(Health Disclaimer : येथील आरोग्यविषयक माहिती ही केवळ सामान्य माहिती आणि जागरूकतेसाठी दिलेली आहे. या माहितीतून होणाऱ्या कोणत्याही परिणामासाठी जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल जबाबदार राहणार नाही.)

हेही वाचा: AI Agent Smartphone: आता स्मार्टफोनमध्ये एकही ॲप नसेल; सगळं काही AIच करेल, जाणून घ्या हे तंत्रज्ञान

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number