अहमदनगर जिल्हा रुग्णालयातल्या आगीची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

  अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.   रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागल्यामुळे संपूर्ण अतिदक्षता विभाग भस्मसात झाले आहे. या भीषण आगीत १० जणांचा मृत्यू […]

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातल्या आगीची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

  अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

  रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागल्यामुळे संपूर्ण अतिदक्षता विभाग भस्मसात झाले आहे. या भीषण आगीत १० जणांचा मृत्यू झाल्याची तसेच काही रुग्ण जळल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वजण ५० ते ८५ या वयोगटातील होते.

  महापालिकेचे अग्निशमन दल आणि एसआयडीसीचे अग्निशमन दल यांनी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत १० बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या आगीत भाजलेल्या रुग्णांना तातडीने दुसऱ्या कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यातील काही रुग्ण अत्यंत गंभीर अवस्थेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number