हिजाब प्रकरण उच्चस्तरीय खंडपीठाकडे वर्ग

हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात दुसऱ्या दिवशी सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, न्यायाधिशांनी हिजाब प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने मुलींना हिजाब परिधान करून महाविद्यालयात जाण्याची परवानगी देणारे अंतरिम आदेश देण्यास नकार दिला. अंतरिम दिलासा मोठ्या खंडपीठाने विचारात घ्यावा, असे सांगत त्यांनी हे प्रकरण उच्चस्तरीय […]

हिजाब प्रकरण उच्चस्तरीय खंडपीठाकडे वर्ग

हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात दुसऱ्या दिवशी सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, न्यायाधिशांनी हिजाब प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने मुलींना हिजाब परिधान करून महाविद्यालयात जाण्याची परवानगी देणारे अंतरिम आदेश देण्यास नकार दिला. अंतरिम दिलासा मोठ्या खंडपीठाने विचारात घ्यावा, असे सांगत त्यांनी हे प्रकरण उच्चस्तरीय खंडपीठाकडे वर्ग केले.

कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब वादामुळे सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांच्या परिसरात जमावबंदी लागू केली तर कर्नाटकमधील शाळा, महाविद्यालये तीन दिवस बंद करण्यात  आले आहे.

हिजाब प्रकरणाचे पडसाद दिल्ली, महाराष्ट्रातही उमटले आहेत. सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रहार संघटनेचा रास्तारोको आंदोलन करण्यात आले तर हिजाबच्या समर्थनार्थ एमआयएम पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. सोलापूरमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number