शिवसेना महिला संघटक आणि संपर्कप्रमुख, संघटक यांची शिवसेनाभवनात बैठक झाली. अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या. शिवसेनेच्या रणरागिणी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबत आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत कार्यरत राहतील अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. त्यांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. कोण आले , कोण गेले याचा मला फरक पडत नाही. ज्यांना लढायचं असेल, त्यांनी माझ्यासोबत राहावे, पुन्हा नव्याने जोमाने शिवसेनेला उभा करु, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे महिला शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला मारला.
या बैठकी मध्ये उद्धव ठाकरे बोलताना असे म्हणाले कि काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, रिक्षाला ब्रेकच लागत नव्हता.असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. शिंदेंच्या भाषणाला रिक्षावाल्याची बडबड अशी उद्धव यांच्याकडून संभावना करण्यात आली.अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरचा माईक खेचला. पुढच्या काळात काय काय खेचतील, कळणार पण असा तिरकस बाणही त्यांनी फडणवीसांवर सोडला.
उद्धव ठाकरे यांच्या टोल्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून उद्धव ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले हे पाहूया ट्विट च्या माध्यमातून
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.कारण हे सर्वसामान्यांचं सरकार, असे म्हणत मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले आहे.
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!#MaharashtraFirst — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2022