Chicken Popti Recipe: चिकन पोपटी ही कोकणातील पारंपरिक आणि खास डिश असून मातीच्या मडक्यात अंगारावर शिजवली जाते. ताज्या भाज्या, मसाले आणि चिकन यांचा सुंदर संगम यामध्ये अनुभवायला मिळतो. भांबुर्डीच्या पाल्यामुळे याला वेगळीच सुगंध आणि चव येते. गावाकडच्या पद्धतीने बनवलेली ही पोपटी खवय्यांसाठी एक अनोखा आणि स्वादिष्ट अनुभव ठरते.
साहित्य :
- वालाच्या शेंगा
- चिकन (मध्यम तुकडे)
- 5-6 अंडी
- 3-4 बटाटे (मोठे तुकडे)
- 2 कांदे (मोठे तुकडे)
- हळद
- पोपटीसाठी खास मसाला / घरचा मसाला / चिकन मसाला
- आलं-लसूण पेस्ट
- जाड मीठ
- ओवा
- मध्यम आकाराचं मातीचं मडकं
- भांबुर्डीचा पाला
हेही वाचा: Beetroot Halwa Recipe: नुसतं बीट खाऊन कंटाळलात? अशा पद्धतीने बनवा स्वादिष्ट बीट हलवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
कृती :
- सर्वप्रथम मडकं, वालाच्या शेंगा आणि भांबुर्डीचा पाला स्वच्छ धुऊन घ्या.
- चिकन मॅरिनेट करण्यासाठी चिकनमध्ये हळद, तिखट, चिकन मसाला, आलं-लसूण पेस्ट घालून 20–30 मिनिटं मॅरिनेट करा.
- मडक्याच्या तळाशी भांबुर्डीचा पाला नीट पसरवा.
- त्यावर वालाच्या शेंगांचा थर लावा.
- मग त्यावर चिकनचे काही तुकडे, अंडी, बटाटे आणि कांदे घाला.
- आता त्यावर थोडं जाड मीठ आणि ओवा पसरवा.
- यानंतर पुन्हा भांबुर्डीचा पाला घालून उरलेल्या सर्व साहित्याचा दुसरा थर लावा.
- शेवटी मडक्याचं तोंड भांबुर्डीच्या पाल्याने व्यवस्थित झाका, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही.
पोपटी शिजवण्याची पद्धत :
- मोकळ्या जागेत मडक्याच्या आकारापेक्षा थोडा मोठा आणि खोल खड्डा खणून घ्या.
- खड्ड्यात आधी सुकलेला पाला किंवा पेंडा टाका आणि त्यावर मडकं उलटं ठेवा.
- मडक्याभोवती लाकडं, सुकलेला पाला किंवा शेणाच्या गोवऱ्या लावून पेटवा.
- साधारण 30 मिनिटं शिजू द्या. जाळ जास्त असल्यास वेळ कमी लागू शकतो.
- मडकं थंड झाल्यावर सावधपणे उघडा.
- गरमागरम चिकन पोपटीचा आनंद घ्या.
टिप्स:
- चुलीवर/कोळशावर बनवलेली पोपटी अधिक चविष्ट लागते.
- मध्ये भांडं उघडू नका, नाहीतर वाफ बाहेर जाईल.