‘पती करेल ते पत्नी करू शकेल का?’ – धनंजय महाडिक

उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी राजकारण तापले असून काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. काँग्रेस आणि भाजप नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून, अशातच भाजप नेते धनंजय महाडिक यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. भाजप नेते धनंजय महाडिक यांनी महिलांचा अपमान केला असल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे. पती करेल ते पत्नी करू शकेल का?, असा सवाल […]

‘पती करेल ते पत्नी करू शकेल का?’ – धनंजय महाडिक

उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी राजकारण तापले असून काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. काँग्रेस आणि भाजप नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून, अशातच भाजप नेते धनंजय महाडिक यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

भाजप नेते धनंजय महाडिक यांनी महिलांचा अपमान केला असल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे. पती करेल ते पत्नी करू शकेल का?, असा सवाल धनजंय महाडिक यांनी उपस्थित केला आहे. धनंजय महाडिक यांच्या या विधानामुळे राजकारणात संतापाची लाट उसळली असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

धनंजय महाडिक म्हणाले, काँग्रेसचे लोक येतील आणि तुम्हाला सांगतील आम्ही एक महिला उमेदवार उभी केली आहे. ती बिचारी आहे. तुम्ही सर्व महिला आहात तर तिला मतदान करा. त्यांना विचारा एक पुरुष करतो ती कामे महिला करू शकणार नाही, असे वक्तव्य महाडिक यांनी केली आहे. त्यामुळे आता कोल्हापुरमधील राजकारण तापले असून महिलांनी धनंजय महाडिकांच्या विरोधात आंदोलन केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number