बुलडाण्यात राज्यसरकार विरोधात साजरी झाली ‘काळी दिवाळी’

  बुलडाणा जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चिखली विधानसभा मतदार संघात ८० टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामधील केवळ साडेचार हजार शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाई देण्यात आली. उर्वरित शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत चिखली विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार श्वेता महाले यांनी शेतकऱ्यांसह काळी दिवाळी […]

बुलडाण्यात राज्यसरकार विरोधात साजरी झाली ‘काळी दिवाळी’

  बुलडाणा जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चिखली विधानसभा मतदार संघात ८० टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामधील केवळ साडेचार हजार शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाई देण्यात आली. उर्वरित शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत चिखली विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार श्वेता महाले यांनी शेतकऱ्यांसह काळी दिवाळी साजरी करण्यात आली.

  बुलडाण्यात जोरदार झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे उभे पीक जमीनदोस्त झाली. या परिस्थितीत बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी राज्यसरकारकडे केली होती. मात्र चिखली विधानसभा मतदार संघात ८० टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यापैकी केवळ साडेचार हजार शेतकरी मदतीसाठी पात्र ठरली. उर्वरित शेतकऱ्यांना अद्याप शासनाकडून मदत करण्यात आली नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या निषेधार्थ तसेच सर्व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी चिखली विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार श्वेता महाले यांनी शेतकऱ्यांसह ठिकठिकाणी काळी दिवाळी साजरी केली. श्वेता महाले यांनी शेतकऱ्यांसोबत बेसन-भाकर खाऊन सरकारचा निषेध केला आहे. सोबत काळे कंदील आणि काळे झेंडे लावून काळी दिवाळी साजरी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number