मिटकरींवर कारवाई करण्याची ब्राह्मण समाजाची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीत पार पडलेल्या सभेत ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले. त्यामुळे ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला असून अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ब्राह्मण समाजाने केली आहे. खासादर सुप्रिया सुळे यांच्याकडे ब्राह्मण समाजाने मिटकरींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अमोल मिटकरी यांनी सांगलीतील सभेत ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवल्याच्या निषेधार्थ पंढरपुरमध्ये […]

मिटकरींवर कारवाई करण्याची ब्राह्मण समाजाची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीत पार पडलेल्या सभेत ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले. त्यामुळे ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला असून अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ब्राह्मण समाजाने केली आहे. खासादर सुप्रिया सुळे यांच्याकडे ब्राह्मण समाजाने मिटकरींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अमोल मिटकरी यांनी सांगलीतील सभेत ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवल्याच्या निषेधार्थ पंढरपुरमध्ये खा.सुप्रिया सुळे यांना ब्राह्मण समाजातील बांधवांनी श्री विठ्ठल मंदिरा बाहेर घेराव घालत आमदार मिटकरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. आमदार अमोल मिटकरी हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ब्राह्मण समाज बांधवांनी पंढरपुरात खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे.

अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अमोल मिटकरींनी भाषणात ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची खिल्ली उडवणारी वक्तव्य केली. त्यामुळे ब्राह्मण समाजाने मिटकरींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

तसेच मिटकरींच्या वक्तव्यामुळे पुण्यात ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला असून पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनादरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number