काळा घोडा महोत्सवाला सुरुवात

मुंबई शहरातील प्रसिद्ध महोत्सवांपैकी काळा घोडा कला महोत्सव हा त्यापैकीच एक आहे. ज्याची दरवर्षी खूप प्रतीक्षा असते. साहित्यिक आणि सामाजिक चर्चांपासून ते कार्यशाळा आणि पुस्तक प्रकाशनांपर्यंत, संगीताच्या आनंदापासून ते नृत्य सादरीकरणापर्यंत, मंत्रमुग्ध करणाऱ्या दृश्य कला ते हस्तकला या उत्सवात असतो. हा उत्सव प्रत्येक कला जाणकारासाठी एक संमोहन आनंद देणारा सर्व प्रकारातील कलेचे जतन आणि संरक्षण […]

काळा घोडा महोत्सवाला सुरुवात

मुंबई शहरातील प्रसिद्ध महोत्सवांपैकी काळा घोडा कला महोत्सव हा त्यापैकीच एक आहे. ज्याची दरवर्षी खूप प्रतीक्षा असते. साहित्यिक आणि सामाजिक चर्चांपासून ते कार्यशाळा आणि पुस्तक प्रकाशनांपर्यंत, संगीताच्या आनंदापासून ते नृत्य सादरीकरणापर्यंत, मंत्रमुग्ध करणाऱ्या दृश्य कला ते हस्तकला या उत्सवात असतो. हा उत्सव प्रत्येक कला जाणकारासाठी एक संमोहन आनंद देणारा सर्व प्रकारातील कलेचे जतन आणि संरक्षण करणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. कोरो या संस्थेकडून संविधानाची येणारी ७५ वी साजरी करण्यासाठी प्रदर्शन करण्यात आलं आहे. वेगवेगळया भाषेतील संविधानाचे पोस्टर इथे लावण्यात आले आहे. आर के लक्ष्मण यांचे कॉमन मॅन यांचा पुतळा या उत्सवात आहे.

यावर्षी हा महोत्सव 04 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून या महोत्सवात यंदा खाद्यपदार्थासह विविध वस्तू, पुस्तके, कपडे आणि शोभेच्या वस्तूंचे सुमारे ८० स्टॉल लावण्यात आले आहेत. काळा घोडा महोत्सवामध्ये कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी मोठी संधी देण्यात येते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे या ठिकाणी कलावंतांनी सादर केलेल्या कलाकृती आहेत या ठिकाणी कलावंतांनी संगणकाच्या कीबोर्ड चा वापर करून बनवलेली कार असेल केवळ तारांचा वापर करून बनवलेली रिक्षा असेल संगणकामधील चीपचा वापर करून बनवलेली मोटरसायकल असेल असे अनेक कलाकृतीमधून कलावंतांनी आपली कला सादर केली आहे.

ठिकाणी कनिका या कलावंताने काथ्यांपासून बनवलेला मोठा बूट आणि त्यासाठी वापरण्यात आलेल्या चिंद्या आणि इतर बाबी काय दर्शवतात हे सांगितले आहे. आपल्या पायातील भूत हे नेहमीच आपल्याला पुढे जायला भाग पाडत असतात. त्याचप्रमाणे ते मागेही जातात म्हणजेच भूतकाळ आणि भविष्याचा बुटाशी संबंध आहे. याच बुटाचा मातीशी ही तितकाच संबंध आहे म्हणजे आपण नेहमी जमिनीवर असायला पाहिजे आणि जमिनीची पर्यावरणाशी आपलं नातं कायम टिकवायला पाहिजे हे बूट दाखवतात असं कनिका सांगतात त्यांनी अतिशय कल्पकतेने आणि सर्जनशीलतेने बनवलेली ही कलाकृती तिथल्या कलाप्रेमीना खूप आवडत असून सर्वजण या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी गर्दी करू लागल्याचे दिसते आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number