भाजपकडून महापालिकेच्या पायऱ्यांवर सोमय्यांचा सत्कार

भाजप नेते किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटण्यासाठी आले आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. तसेच याठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली. यावेळी भाजपकडून महापालिकेच्या पायऱ्यांवर किरीट सोमय्यांचा सत्कार करण्यात आला. सोमय्यांचा सत्कार करायला पोलिसांची परवानगी नसूनही त्यांना शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. उद्धव ठाकरेंच्या […]

भाजपकडून महापालिकेच्या पायऱ्यांवर सोमय्यांचा सत्कार

भाजप नेते किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटण्यासाठी आले आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. तसेच याठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली. यावेळी भाजपकडून महापालिकेच्या पायऱ्यांवर किरीट सोमय्यांचा सत्कार करण्यात आला. सोमय्यांचा सत्कार करायला पोलिसांची परवानगी नसूनही त्यांना शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. उद्धव ठाकरेंच्या गुंडांनी याच पायऱ्यांवर माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मविआने ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट दिले असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे. या कोविड सेंटरचा मालक केएम रुग्णालयाचा मालक आहे. त्यामुळे कोरोनाकाळात मविआने जनतेच्या जीवाशी खेळ केला, अशी टीका किरीट सोमय्यांनी केली आहे.

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी पालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या मागील शनिवारी पुणे महानगरपालिकेत आले होते. यावेळी त्यांच्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यावर हल्ला केला. पालिकेच्या पायऱ्यांवरच त्यांच्यावर मारहाण करण्यात आली. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर पुणे मनपाच्या पायऱ्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. तसेच पुण्यात किरीट सोमय्या यांचा सत्कार करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, तरीही भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला तर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवरसुद्धा धक्काबुक्की करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number