भाजप नगरसेविका चंदा लोखंडे यांचा राजीनामा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यापासून शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दुसरा धक्का बसला आहे. भाजप नगरसेविका चंदा लोखंडे यांनी नगरसेवक पक्षाचा राजीनामा दिला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून भाजपला ‘धक्के पे धक्का’ बसत आहे. काही दिवसांपूर्वी वसंत बोराटे यांनी […]

भाजप नगरसेविका चंदा लोखंडे यांचा राजीनामा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यापासून शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दुसरा धक्का बसला आहे. भाजप नगरसेविका चंदा लोखंडे यांनी नगरसेवक पक्षाचा राजीनामा दिला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून भाजपला ‘धक्के पे धक्का’ बसत आहे. काही दिवसांपूर्वी वसंत बोराटे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता पिंपळेगुरव प्रभाग २९चे महापालिकेत प्रतिनिधित्व करत असलेल्या नगरसेविका चंदा लोखंडे यांनी राजीनामा दिला असून आयुक्तांनी त्यांचा राजीनामा स्विकारला आहे.

वसंत बोराटे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे आता चंदा लोखंडे या देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number