मक्याचं कणीस खाण्याचे फायदे

पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याचा आनंद हा निराळाच असतो. पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला हे मक्याचे कणीस विकणारे बरेच दिसतात. पण हे कणीस आपल्या आरोग्यसाठीही खूप फायदेशीर आहे हे माहीत असणारे फार कमी लोक असतील. तर जाणून घेऊया कणीस खाण्याचे फायदे : ऊर्जा- कर्बोदके हे ऊर्जेचे मुख्य स्त्रोत मानले जातात. मक्याच्या कणसात भरपूर कर्बोदके असलयाने पोट भरण्यासोबतच ते […]

मक्याचं कणीस खाण्याचे फायदे

पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याचा आनंद हा निराळाच असतो. पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला हे मक्याचे कणीस विकणारे बरेच दिसतात. पण हे कणीस आपल्या आरोग्यसाठीही खूप फायदेशीर आहे हे माहीत असणारे फार कमी लोक असतील. तर जाणून घेऊया कणीस खाण्याचे फायदे :

ऊर्जा- कर्बोदके हे ऊर्जेचे मुख्य स्त्रोत मानले जातात. मक्याच्या कणसात भरपूर कर्बोदके असलयाने पोट भरण्यासोबतच ते खाल्ल्याने तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळते.

कोलेस्टेरॉल – मक्याचे कणीस खाल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते. मक्यात व्हिटॅमिन सी बायोफ्लाव्होनॉइड्स, कॅरोटीनोइड्स, फायबर असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

कर्करोग – मक्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स भरपूर असतात, हे कर्करोगाचा धोका कमी करण्यास उपयुक्त आहे. याशिवाय, मक्यात फेरुलिक ऍसिड असते जे स्तन आणि यकृताच्या ट्यूमरचा आकार कमी करण्यात मोठी भूमिका बजावते.

त्वचा – मक्यामध्ये बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. जे जीवनसत्त्व -अ जीवनसत्त्व -क आणि इतर अँटिऑक्सिडेंट बनवते.

हाडे- मक्यामध्ये फॉस्फरस मॅग्नेशियम आणि लोहासारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात, ही खनिजे तुमच्या हाडांचे आरोग्य राखण्यात मदत करतात.

डोळे- मक्यामध्ये बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. हे जीवनसत्त्व -अ तयार करण्यास मदत करते. त्यामुळे आपली दृष्टी सुधारण्यासाठी आणि डोळ्यांशी संबंधित विविध समस्यांपासून बचाव करण्यास मदत होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number