‘नायलॉन मांजा विकाल तर खबरदार’

येवला शहरामध्ये सर्रास नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने या मांज्यामुळे अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या असून, रविवारी एकाच दिवसात एका तरुणाचा गळा चिरला गेला तर दोन चिमुकल्या मुली मांज्यामुळे जखमी झाल्या होत्या. हीच बातमी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने दाखवताच पोलिसांनी पतंग आणि मांजा विक्रेत्यांना नोटीस दिली असून जर कोणी नायलॉन मांजा विक्री करताना सापडल्यास त्यावर तडीपारची […]

‘नायलॉन मांजा विकाल तर खबरदार’

येवला शहरामध्ये सर्रास नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने या मांज्यामुळे अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या असून, रविवारी एकाच दिवसात एका तरुणाचा गळा चिरला गेला तर दोन चिमुकल्या मुली मांज्यामुळे जखमी झाल्या होत्या. हीच बातमी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने दाखवताच पोलिसांनी पतंग आणि मांजा विक्रेत्यांना नोटीस दिली असून जर कोणी नायलॉन मांजा विक्री करताना सापडल्यास त्यावर तडीपारची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नितीन खडांगळे यांनी दिले आहे.

एकूणच नायलॉन मांजाचा वापर बंदी असतांनाही सर्रास वापरला जात असल्याने नाशिक शहर पोलीसांनी देखील कंबर कसली आहे. त्यामुळे येत्या काळात नायलॉन मांजा विक्रीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मकर संक्रात तोंडावर आलेली असतांना नाशिक शहर पोलीसांनी हाती घेतलेली मोहीम पाहून नागरिक त्यांचे स्वागत करत असून कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहे.

नायलॉन मांजा बाबत तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापण्यात आला आहे. नागरिकांना ०७१२-२५६२६६८ किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ यावर तसेच जवळच्या महानगरपालिका झोन कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती कार्यालय येथे देखील नायलॉन मांजाबाबत तक्रारी दाखल करता येतील. या घेतलेल्या निर्णयामुळे आत्ता तरी लोकांचे प्राण वाचतील अशी अपेक्षा आहे. नायलॉन मांजा विकणे किंवा विकत घेणे बंद करावे याने लोकांच्या जीव वाचेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number