'बाल्कन नोस्ट्राडेमस' म्हणजेच बाबा वेंगा यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या असल्याचा दावा केला जातो. बाबा वेंगा यांनी येणाऱ्या अनेक वर्षांसाठी भविष्यवाणी केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी 2026 साठी देखील भविष्यवाणी केली होती. त्यानुसार त्यांनी सोने-चांदीच्या दरात देखील भविष्यवाणी केली आहे. इराणसोबतचा तणाव आणि अलीकडील जागतिक घडामोडींमुळे सोन्याच्या किमती चढ-उतार यांसारख्या गोष्टी दिसून आल्या आहेत. भारतात सोने केवळ एक दागिना नसून ते सुरक्षितता आणि आर्थिक स्थिरतेचे प्रतीकही आहे. अशातच बाबा वेंगा यांनी 2026 साठी सोन्याच्या किंमतीबाबत केलेली भविष्यवाणी लक्ष वेधून घेत आहे. यात जागतिक आर्थिक संकट आणि बँकिंग प्रणालीतील अस्थिरतेच्या शक्यतेचा समावेश आहे.
बाबा वेंगाची भविष्यवाणी काय ?
बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार, येत्या काळात सोन्याच्या किंमती प्रचंड वाढतील. इराण युद्ध दीर्घकाळ चाललं तर सोन्याच्या किंमतीत मोठी उसळी पाहायला मिळू शकते. ज्याची आपण कल्पनाही केली नसेल असं मोठं आर्थिक संकट या वर्षी जगभरात येणार आहे. सोन्याच्या किमंतीत 25 ते 40 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. यादरम्यान सध्याचा दर 10 ग्राम सोन्याच्या किंमत 1.9 लाख रुपयांवरुन 2.1 लाख रुपयांपर्यंत उसळी घेऊ शकतात.
तज्ञांचा सल्ला
तज्ञांच्या मते, मेरिकी फेडरल रिझर्व्हचे निर्णय, रुपयाचे अवमूल्यून आणि महागाईही सोन्याची किंमत वाढवण्याचं काम करते. सोन्याच्या किमतींवर यूएस फेडरल रिझर्व्हचे निर्णय, चलनवाढ, चलनातील चढ-उतार आणि जागतिक भू-राजकीय परिस्थिती यांसारख्या अनेक घटकांचा प्रभाव पडतो. भू-राजकीय तणावामुळे किमती वाढू शकतात, परंतु त्यावर कोणताही तोडगा निघाल्यास किमतींमध्ये घसरण होऊ शकते. बँकांवरील विश्वास जेवढा कमी होईल, बाजारात सोन्याचं मूल्य तेवढंच वेगाने वाढेल. याच कारणामुळे सोन्याच्या किंमतीत येत्या काळात उसळी पाहायला मिळू शकते.
ग्राहकांवर काय परिणाम होणार?
सोने-चांदीच्या किमतींमध्ये कोणतीही मोठी वाढ झाल्यास, विशेषतः मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या खरेदीच्या निर्णयांवर परिणाम होऊ शकतो. सध्या लग्नाचा सीझन सुरु झाला आहे, इतकचं नव्हे तर सणसमारंभांना देखील आता सुरुवात होईल, अशावेळी बाबा वेंगांच्या या भविष्यवाणीने मध्यम वर्गाला चिंतेत टाकले आहे. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी प्रमाणे जर 10 ग्राम सोन्याची किंमत 2 लाखांच्या पार गेली तर सर्व सामान्यांना सोनं खरेदी करणं परवडणार नाही. सोनं नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. पण यात जास्त पैसा लावताना आपल्या आर्थिक योजनांनुसार निर्णय घेणं बेस्ट ठरतं.