एकतर्फी प्रेमातून तरूणीला जाळण्याचा प्रयत्न ; प्रकृती चिंताजनक

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात हैदराबाद येथील घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. शहरातील नंदोरी चौकात दोन तरुणांनी दुचाकीने येऊन शाळेत शिकवण्यासाठी जात असलेल्या तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सकाळी ७.२० च्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेने शहरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. यात तरुणी शिक्षिका गंभीर जखमी झाली […]

एकतर्फी प्रेमातून तरूणीला जाळण्याचा प्रयत्न ; प्रकृती चिंताजनक

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात हैदराबाद येथील घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. शहरातील नंदोरी चौकात दोन तरुणांनी दुचाकीने येऊन शाळेत शिकवण्यासाठी जात असलेल्या तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सकाळी ७.२० च्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेने शहरात एकच खळबळ निर्माण झाली आहे.

यात तरुणी शिक्षिका गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी नागपूर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. येथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस तिच्यासाठी महत्वाचे असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

आरोपी तरुणाचे नाव विकास विवेक नगराळे दरोडा व त्याचा एक मित्र असे हे दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

तरूणीवर पेट्रोल टाकणारा तरूण ही हिंगणघाट येथील राहणारा आहे. एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले. तरुणी शिक्षिका शहरातील तुळसकर काॅलेजमध्ये शिकविण्यासाठी जात असतानाच हे दोन तरुण आले व तिच्यासोबत शाब्दिक वाद घालून तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळून आरोपी फरार झाले.

यात ती 30 टक्के भाजली आहे. तिच्या चेहऱ्याचा अक्षरशः कोळसा झाला आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सध्या तिची वाचा गेली असून तिची दृष्टी ही जाण्याची शक्यता आहे. तिची दृष्टी आणि वाचा राहील की नाही या बद्दल डॉक्टर साशंक आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.

आरोपी मुलगा विवाहित असून त्याने तीन महिन्यांपूर्वी मुलीला त्रास दिला होता. मात्र या घटनेची तक्रार पोलिसात दाखल झाली नव्हती. असे चौकशीतून समोर आले आहे.

तसेच या घटनेचे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटतांना दिसत आहेत. हिंगणघाट येथे महाविद्यालयाचे सहकारी शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन कारवाईची मागणी केली आहे.

10 दिवसाच्या आत त्याची आरोपपत्र दाखल करून फास्टट्रॅक कोर्टात प्रकरण चालवण्याची मागणी करणार असल्याचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी सांगितले. या घटनेच्या आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number