देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणुका टप्प्यांमध्ये घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. दरम्यान उत्तर प्रदेशासह पाच राज्यातील निवडणुकीची मतमोजणी १० मार्च रोजी होणार आहे.
गोवा, मणिपुर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका पार पडणार असून ६९० विधानसभा जागांवर मतदान पार पडणार आहे. मात्र कोरोना काळात निवडणुका घेणे हे आव्हानात्मक असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करतच निवडणुका होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारीपर्यंत रोड शो, पदयात्रा, प्रचार यात्रा काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर १० फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडणार असून १० मार्च रोजी या पाचही राज्यांचा निकाल जाहीर होणार आहे.
पंजाब, गोवा, उत्तराखंड – १४ फेब्रुवारी
मणिपूर
उत्तर प्रदेश