PM Modi VS Moshin Naqvi : आशिया कप ट्रॉफीप्रकरण; मोहसिन नकवी बरळला, ‘युद्ध हे अभिमानाचे माप असेल तर…’

भारत-पाकिस्तानमध्ये नवा वाद पेटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाच्या विजयावर भाष्य करताना “ऑपरेशन सिंदूर” असा उल्लेख केला, त्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड प्रमुख नकवी याने केला आहे.

PM Modi VS Moshin Naqvi : आशिया कप ट्रॉफीप्रकरण; मोहसिन नकवी बरळला, ‘युद्ध हे अभिमानाचे माप असेल तर…’

आशिया कप 2025 च्या विजयानंतर निर्माण झालेल्या गदारोळात पाकिस्तान क्रिकेट बोर्ड व आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसिन नक़वी हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सामन्यानंतर नक़वी ट्रॉफीसह मैदानातून निघून गेल्याने मोठा वादंग उभा राहिला. या दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर” अशा शब्दांत भारतीय संघाचे कौतुक केले.

मोदींच्या या वक्तव्यावर नक़वी बरळला आहे. त्यानी म्हटले की, “जर युद्ध हे अभिमानाचे माप असेल तर इतिहास तुमच्या पाकिस्तानकडून झालेल्या पराभवांची नोंद आधीच करून ठेवतो. क्रिकेटमध्ये युद्ध ओढून आणणे हे फक्त हतबलतेचे चिन्ह आहे आणि खेळाच्या आत्म्यास कलंक लावणारे आहे.” त्याच्या या प्रतिक्रियेने सोशल मीडियावर नवी चर्चा सुरू झाली.

दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच विकेट्सने विजय मिळवत आशिया कप जिंकला. परंतु, पारितोषिक वितरण सोहळ्यात भारतीय खेळाडूंनी नक़वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर नक़वीनी हट्ट धरत ट्रॉफी इतर कोणाकडूनही दिली जाऊ नये असा अडसर घातला आणि स्वतः ती ट्रॉफी घेऊन हॉटेलमध्ये निघून गेला.

भारतीय खेळाडूंनी या प्रसंगाला वेगळ्याच अंदाजात सामोरे जात ट्रॉफीशिवाय आनंदोत्सव साजरा केला. त्यांनी काल्पनिक ट्रॉफी हाती घेतलेले फोटो काढून सोशल मीडियावर टाकले आणि नक़वीची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली. या प्रसंगाने नक़वीवर चौफेर टीका होत असून, त्यांनी खेळाचे राजकारणात रूपांतर केल्याचा आरोप होत आहे.

या स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले होते. कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी गटसामन्यातील विजय भारतीय जवानांना समर्पित केला होता, तसेच अंतिम सामन्यानंतर त्यांनी सर्व सामन्यांचे मानधन भारतीय लष्कराला दान करण्याची घोषणा केली. त्यामुळे भारताच्या विजयाचा उत्साह कोणत्याही अडथळ्याने कमी झाला नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number