अशोक चव्हाणांना कोरोनाची लागण

राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीलाच अनेक राजकीय नेते कोरनाच्या विळख्यात सापडले आहेत. काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाली असल्याची […]

अशोक चव्हाणांना कोरोनाची लागण

राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीलाच अनेक राजकीय नेते कोरनाच्या विळख्यात सापडले आहेत. काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहनही अशोक चव्हाणांनी केले आहे.

कोरोनाबाधित असताना अशोक चव्हाण मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित होते. दरम्यान, त्यांचा वैद्यकीय अहवाल येताच ते बैठकीतून बाहेर आले. तसेच त्यांना कोणताही त्रास जाणवत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करत काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number