Ashadi Ekadashi Upvas Special : आषाढी एकादशीच्या उपवासाला यंदा या नवनवीन आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद घ्या; बनवायलाही आहेत सोपे

अवघ्या दोन दिवसांवर आषाढी एकादशी आलेली आहे. या निमित्ताने अनेक भाविक उपवास धरतात. मात्र नोकरी करणारे, कामावर जाणारे उपाशीपोटी उपवास करू शकत नाहीत. अशावेळी उपवासाचे पदार्थ हा त्यांचा मोठा आधार बनतो. आषाढी एकादशीच्या उपवासाला तेचतेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हे नवीन पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता. आषाढी एकादशीच्या उपवासासाठी साबुदाणा खिचडी आणि वरीचा भात […]

Ashadi Ekadashi Upvas Special : आषाढी एकादशीच्या उपवासाला यंदा या नवनवीन आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद घ्या; बनवायलाही आहेत सोपे

अवघ्या दोन दिवसांवर आषाढी एकादशी आलेली आहे. या निमित्ताने अनेक भाविक उपवास धरतात. मात्र नोकरी करणारे, कामावर जाणारे उपाशीपोटी उपवास करू शकत नाहीत. अशावेळी उपवासाचे पदार्थ हा त्यांचा मोठा आधार बनतो. आषाढी एकादशीच्या उपवासाला तेचतेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हे नवीन पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता. आषाढी एकादशीच्या उपवासासाठी साबुदाणा खिचडी आणि वरीचा भात याव्यतिरिक्त साबुदाणा वडे, उपवासाची बटाट्याची उसळ, कुरकुरीत भगर-साबुदाणा घावण, आणि शिंगाड्याच्या पिठाचे मेदू वडे यांसारखे अनेक सात्त्विक आणि ऊर्जा देणारे पदार्थ उत्तम मानले जातात.

हेही वाचा : Devshayani Ekadashi 2026 : कधी आहे महापुण्यदायी देवशयनी एकादशी? 24 की 25 जुलै? जाणून घ्या योग्य तारीख आणि पूजेचे मुहूर्त

उपवासासाठी बनवता येणारे विविध पौष्टिक पदार्थ – 

साबुदाणा खिचडी : भिजवलेला साबुदाणा, बटाटा, शेंगदाण्याचा कूट आणि साजूक तुपाचा वापर करून केलेली खिचडी.

उपवासाचे घावन : भगर आणि साबुदाणा यांचे मिश्रण एकत्र करून तव्यावर तुपावर बनवलेले हलके-फुलके घावन.

कुरकुरीत मेदू वडे : भगर, साबुदाणा आणि उकडलेल्या बटाट्यापासून तयार केलेले वडे जे तुम्ही शेंगदाण्याच्या आमटीसोबत खाऊ शकता.

बटाट्याची उसळ : उकडलेला बटाटा, जिरे, मिरची आणि शेंगदाण्याचा कूट घालून १० मिनिटांत तयार होणारी झटपट उसळ.

कच्च्या केळीचे कबाब किंवा भजी : ऊर्जा देणारे आणि चविष्ट असे कच्चे केळीचे कबाब.

फळे आणि दूध : उपवासात केळी, सफरचंद, पपई यांसारखी फळे आणि दूध किंवा दही यांचे सेवन करणे आरोग्यदायी असते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number