मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
परमबीर सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर संजय पांडे यांची महाराष्ट्राच्या प्रभारी महासंचालकपदी वर्णी लागली होती.
पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार संजय पांडे यांच्याकडे होता. त्यानंतर पोलीस महासंचालकपदी मागील आठवड्यात रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे संजय पांडे यांनी राज्य सरकारला पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. बदली करताना आपला अनुभव डावलल्याची खंतही त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केली होती. दरम्यान, हेमंत नगराळे यांची सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.