एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अण्णा हजारेंचा पाठिंबा

  राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. अण्णा हजारे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात प्रत्यक्षात सहभागी होणार नाहीत. मात्र, कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्यासंबंधी शिष्टमंडळाला सूचना केल्या आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही चर्चा करणार असल्याची तयारी अण्णा हजारे यांनी दाखवली आहे.  राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांनी एकमेकांचा विचार करायला […]

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अण्णा हजारेंचा पाठिंबा

  राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. अण्णा हजारे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात प्रत्यक्षात सहभागी होणार नाहीत. मात्र, कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्यासंबंधी शिष्टमंडळाला सूचना केल्या आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही चर्चा करणार असल्याची तयारी अण्णा हजारे यांनी दाखवली आहे.

 राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांनी एकमेकांचा विचार करायला हवा. कर्मचाऱ्यांनी शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केले पाहिजे. कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेची हानी होता कामा नये. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करूनही सरकारला जाग येत नसेल तर सरकारवर दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही, असे अण्णा हजारे म्हटले आहेत.

 एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासाठी तसेच वार्षिक वेतन वाढण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. भाजप नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. त्यातच आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला आहे.

 एसटी कर्मचाऱ्यांचा संप अधिक तीव्र होत आहे. तसेच अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. तर अनेकांना निलंबित करण्यात आले. तरीही एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यांच्या भेटीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंबंधी काही तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number