निधी वाटपावरून अजित पवारांचे फडणवीसांना उत्तर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक निधी घेतला असून शिवसेनेला कमी निधी दिली असल्याची टीका केली होती. या टीकेला अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार यांनी आकडेवारी सादर करत फडणवीसांचा दावा फेटाळून लावला आहे. अर्थसंकल्पीय विषयावर चर्चा करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी आकडेवारी सादर केली आहे. ते म्हणाले, सरकार कुणाचेही […]

निधी वाटपावरून अजित पवारांचे फडणवीसांना उत्तर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक निधी घेतला असून शिवसेनेला कमी निधी दिली असल्याची टीका केली होती. या टीकेला अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार यांनी आकडेवारी सादर करत फडणवीसांचा दावा फेटाळून लावला आहे.

अर्थसंकल्पीय विषयावर चर्चा करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी आकडेवारी सादर केली आहे. ते म्हणाले, सरकार कुणाचेही असले तरी असा निधी देता येत नाही. दुजाभाव  करता येत नाही. एखादे विभाग कुणाकडे असले तर त या विभागाचे पैसे त्या राजकीय पक्षाचे वैयक्तिक नसतात. राज्याच्या अर्थसंकल्प तयार होतो, त्यावर राज्याचा मुख्यमंत्र्यांची अंतिम सही असते. कोणतेही सरकार चालवायचे असेल, टिकवायचे असले, पुढे न्यायचे असेल तर भेदभाव करून चालणार नाही. भेदभाव केला तर सरकार चार दिवसही चालणार नाही. त्यामुळे असा प्रयत्न शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष करत नाही, असे ते म्हणाले.

आमदारांच्या विकास निधीत वाढ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व आमदारांच्या स्थानिक विकास निधीत ४ ऐवजी ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. तर आमदारांच्या वाहनचालकाला २० हजार रुपये आणि आमदारांच्या स्वीय सहाय्यकाला ३० हजार रुपये देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षात वाढ करण्यात आली नव्हती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number