अभिनेता अरविंद कुमार याचे निधन

मुंबई, १३ जुलै २०२३, प्रतिनिधी : सब टीव्ही वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लापतागंज’मध्ये चौरसियाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद कुमार याचे निधन झाले आहे. 10 जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले.या बातमीने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. लपतागंज फेम अभिनेता अरविंद याचे हृदयाच्या झटक्याने निधन झाले. मालिकेच्या शूटसाठी जात असताना त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला […]

अभिनेता अरविंद कुमार याचे निधन

मुंबई, १३ जुलै २०२३, प्रतिनिधी : सब टीव्ही वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लापतागंज’मध्ये चौरसियाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद कुमार याचे निधन झाले आहे. 10 जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले.या बातमीने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

लपतागंज फेम अभिनेता अरविंद याचे हृदयाच्या झटक्याने निधन झाले. मालिकेच्या शूटसाठी जात असताना त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापुर्वीच त्याचे निधन झाले. अभिनेता विनोद गोस्वामी यांनी त्यांच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून यासंबंधी माहिती दिली , ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आणि जवळच्यांना मोठा धक्का बसला आहे.अरविंद कुमार लापतागंज मालिकेतील चौरसिया यांचे संवाद आणि भुमिकेसाठी लोकप्रिय होते.

रविंद कुमार यांनी 2004 मध्ये त्यांच्या अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी सब टीव्हीच्या लापतागंज मालिकेत 5 वर्षे चौरसियाची भूमिका केली. याशिवाय त्यांनी क्राइम पेट्रोल आणि सावध इंडिया सारख्या मालिकांमध्येही काम केले आहे.अरविंद यांनी चीनी कम, अंडरट्रायल, रामा राम क्या है ड्रामा आणि मॅडम मुख्यमंत्री अशा चित्रपटांमध्येही काम केलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number