साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

साकीनाका बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत राज्य सरकारच्या वतीने आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मोहन चौहानवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत बलात्कार, हत्या, अॅट्रॉसिटी, जाणीवपूर्वक गंभीर मारहाण यासह हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. घटना नेमकी काय? […]

साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

साकीनाका बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत राज्य सरकारच्या वतीने आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मोहन चौहानवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत बलात्कार, हत्या, अॅट्रॉसिटी, जाणीवपूर्वक गंभीर मारहाण यासह हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

घटना नेमकी काय?

१० सप्टेंबर २०२१च्या मध्यरात्री एक महिला रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळली

जखमी महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केले

महिलेवर बलात्कार झाल्याचं स्पष्ट

घटनेनंतर काही तासांत आरोपी मोहन चौहानला अटक

उपचारादरम्यान ११ सप्टेंबर २०२१ रोजी महिलेचा मृत्यू

१८ दिवसांत पोलिसांकडून याप्रकरणी आरोपपत्र दाखल

गुन्हा घडला त्याच्या २५ दिवस आधीही आरोपीनं महिलेला भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळेच बऱ्याच कालावधीनंतर ती त्याला भेटली तेव्हा रागाच्या भरात नराधमानं तिच्यासोबत हे अमानुष कृत्य केलं. यात लोखंडी सळीचाही त्यानं वापर केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number