रशिया-युक्रेन युद्धाचा आज बारावा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती उद्भवली असून देशामध्ये तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. दरम्यान, युक्रेनच्या लुहान्स्कच्या तेल डेपोमध्ये मोठा स्फोट झाला आहे. युक्रेनमधील लुहान्स्कच्या तेल डेपोमध्ये झालेल्या स्फोटामुळे शहर हादरले असून एका तेल डेपोला आग लागली आहे. या हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. स्फोटानंतर आकाशात काळ्या धुराचे लोट दिसू लागले. मात्र, या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु आपत्कालीन सेवा आग विझवण्याचे काम करत आहेत.