अकोल्याच्या अकोट शहरात पहाटेपासून संचारबंदी लागू

  त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. त्रिपुरा येथील धार्मिक स्थळावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला अमरावतीसह राज्यात हिंसक वळण लागले. त्यामुळे आता अमरावतीनंतर अकोल्यातील तणावग्रस्त परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अकोल्यातील अकोट शहरात पहाटेपासून संचारबंदी लागू करण्यात आली.   अकोल्यातील अकोट शहारातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने अकोटमध्ये संचारबंदी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला […]

अकोल्याच्या अकोट शहरात पहाटेपासून संचारबंदी लागू

  त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. त्रिपुरा येथील धार्मिक स्थळावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला अमरावतीसह राज्यात हिंसक वळण लागले. त्यामुळे आता अमरावतीनंतर अकोल्यातील तणावग्रस्त परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अकोल्यातील अकोट शहरात पहाटेपासून संचारबंदी लागू करण्यात आली.

  अकोल्यातील अकोट शहारातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने अकोटमध्ये संचारबंदी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ नोव्हेंबर सकाळी चार वाजल्यापासून ते १७ नोव्हेंबर सकाळी चार वाजेपर्यंत अकोट शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अकोट शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अकोटमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अकोट शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अमरावती शहरात जमावबंदी लागू

  अमरावतीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आला असून ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. तसेच अमरावतीत इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली. अमरावतीमध्ये भाजपच्या बंदला हिंसक वळण लागले. तर बंददरम्यान अमरावतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून वार्तांकनादरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर दगडफेक करण्यात आली. अमरावतीमध्ये जातीय तणाव चिघळला, असून शिवसेनासुद्धा या बंदमध्ये सहभागी झाली. तसेच आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली. या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number