उदगीरमध्ये ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

आजपासून लातूर येथील उदगीरमध्ये ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरूवात होत आहे. या मराठी साहित्य संमेलनादरम्यान उदगीरमध्ये तीन दिवस साहित्यिकांचा मेळा भरतो. उदगीरवासियांसह राज्यभरातील वाचक आणि रसिक या मेळाव्याचा आस्वाद घेतात. तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची लयलूट होणार आहे. साहित्यिकांबरोबरच संगीत क्षेत्रातील दिग्गज, हास्य अभिनेते, कवी,  गझलकार, कथाकथनकार यांचं सादरीकरणासह राजकीय […]

उदगीरमध्ये ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

आजपासून लातूर येथील उदगीरमध्ये ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरूवात होत आहे. या मराठी साहित्य संमेलनादरम्यान उदगीरमध्ये तीन दिवस साहित्यिकांचा मेळा भरतो. उदगीरवासियांसह राज्यभरातील वाचक आणि रसिक या मेळाव्याचा आस्वाद घेतात.

तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची लयलूट होणार आहे. साहित्यिकांबरोबरच संगीत क्षेत्रातील दिग्गज, हास्य अभिनेते, कवी,  गझलकार, कथाकथनकार यांचं सादरीकरणासह राजकीय नेत्यांच्या भाषणाकडेही लक्ष लागून आहे. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे हे यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. दरम्यान, हे मराठी साहित्य संमेलन २२, २३ आणि २४ एप्रिल असे तीन दिवस असून हे संमेलन उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.

मराठी साहित्य संमेलन मेळाव्याचा योजनाक्रम :

साहित्य समेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज २२ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते १०.०० या वेळेत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी ग्रंथपूजन संमेलनाध्यक्ष भारत सासने यांच्या हस्ते होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून ही ग्रंथदिंडी संमेलनस्थळी दाखल होणार आहेत.

ग्रंथ दिंडीनंतर ध्वजारोहणाचा सोहळा पार पडेल. विविध दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामध्ये ग्रंथ प्रदर्शन, चित्र शिल्प कला दालन, अभिजात मराठी दालन, गझल कट्टा, कवी कट्टा या सारख्या विविध उपक्रमांचे उद्घाटन पार पडणार आहे.

साहित्य संमेलनाच्या अंतिम दिवशी काही ठराविकच कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर चर्चासत्र, गझल कट्टा, कवी कट्टा आणि बालकांसाठी बालकांनी बनवलेल्या कथा आणि कविता वाचन होणार आहे. तर सांयकाळी गायक अवधूत गुप्ते यांच्या संगीत रजणीचा आस्वाद घेता येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number