उत्तर प्रदेश: सध्या सर्वत्र अपघातांचे सत्र सुरु असताना उत्तर प्रदेशामधील मेरठमध्ये हसत्या खेळत्या कुटुंबाचा शेवट झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी संध्याकाळी घरातील कर्ता पुरुष इकबाल हा त्याच्या भावासोबत नमाजा पडण्यासाठी घरातून बाहेर गेला. इकबालच्या घरात दोन बायका आणि पाच मुलं असं एकूण आठ जणांच कुटुंब राहत होत. मात्र त्यादिवशी इकबाल घरातून बाहेर जाताच अवघ्या काही क्षणात इमारतीला भीषण आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केले ज्यामुळे घरातून कोणालाच बाहेर पडता आलं नाही, आणि या आगीमध्ये सर्वांनी मृत्यूला कवटाळलं. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला.
मृतामध्ये जुडवा मुलींसह 5 चिमुकल्यांचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी स्थानिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच अग्निशमन दलाला तेथील अरूंद गल्ल्यातून घटनास्थळाकडे जाण्यासाठी कसरत करावी लागली. आग आटोक्यात येताच आगीत जखमी झालेल्यांना तातडीने जवळच्या रूग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र आगीत गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारादरम्यान 6 जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला.
प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी तसेच इमारतीच्या तळमजल्यावर कपड्यांचे गोदाम होते. कपड्यांमुळे आग झपाट्याने वाढली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र नमाज पडून घरी परतलेल्या पित्याला समोर आपल्या कुटुंबाची झालेला शेवट पाहून प्रचंड धक्का बसला. त्यांच्या आक्रोशाने घटनास्थळावर उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. या घटनेमुळे संपूर्ण मेरठ शहरात शोककळा पसरली