रशियाचे ४३०० सैनिक ठार; युक्रेनचा दावा

युक्रेनमध्ये युद्धाचा भडका उडाला असून रशियाचे लष्करी सैन्य युक्रेनची राजधानी कीव मध्ये हल्ला करत आहे. दरम्यान, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाकडून मोठा दावा करण्यात आला आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेननेसुद्धा रशियाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, रशियाचे ४ हजार ३०० सैनिक युक्रेनच्या विविध भागांमध्ये मारले आहे. तसेच रशियन फौजांचे १४६ […]

रशियाचे ४३०० सैनिक ठार; युक्रेनचा दावा

युक्रेनमध्ये युद्धाचा भडका उडाला असून रशियाचे लष्करी सैन्य युक्रेनची राजधानी कीव मध्ये हल्ला करत आहे. दरम्यान, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाकडून मोठा दावा करण्यात आला आहे.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेननेसुद्धा रशियाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, रशियाचे ४ हजार ३०० सैनिक युक्रेनच्या विविध भागांमध्ये मारले आहे. तसेच रशियन फौजांचे १४६ टँक उद्ध्वस्त करण्यात आले असून २७ लढाऊ विमाने आणि २६ हेलिकॉप्टर्स पाडण्यात आली असल्याचा दावा, हन्ना मेलीयार केली आहे.

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सी यांनी रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल केल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील रशियाची जागा काढून घेतली पाहिजे, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number