Thursday, July 04, 2024 09:16:58 AM

मामा गोविंदाने लावली भाचीच्या लग्नाला हजेरी

मामा गोविंदाने लावली भाचीच्या लग्नाला हजेरी

मुंबई, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : आरती सिंहने २५ एप्रिल रोजी दीपक चौहानसोबत लग्न केले. लग्नाचे अनेक सुंदर फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये आरती खूपच सुंदर दिसत आहे. तिने तिच्या लग्नात भारतीय वधूसारखा लाल रंगाचा लाल ड्रेस परिधान केला होता आणि तिचा नवरा क्रीम रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत होता.
आरतीच्या लग्नासोबतच सर्वजण गोविंदाचीही वाट पाहत होते. सर्व वाद बाजूला ठेवून गोविंदाने या लग्नाचा हजेरी लावली. पण या लग्नात गोविंदाची पत्नी सुनीता दिसली नसली गोविंदा आपल्या मुलासह लग्नाला उपस्थित होता, त्याच्यासोबत त्याची पत्नी किंवा मुलगी दिसली नाही. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत, पण तो एकदाही कृष्णा-काश्मिरासोबत दिसत नाही.

​व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोकांनी विचारले काकू कुठे आहेत?

गोविंदाने भाची आरतीच्या लग्नात हजेरी लावली. गोविंदा निळ्या रंगाच्या सूटमध्ये आल्याचे पाहून लग्नाला उपस्थित असलेले लोकही खूश झाले. गोविंदाने स्टेजवर जाऊन आपल्या भाचीच्या लग्नाचे अभिनंदन केले. तसेच नवीन जीवनाच्या सुरुवातीच्या शुभेच्छा दिल्या.

मात्र, या लग्नात गोविंदा एकटाच पोहोचला आहे. गोविंदासोबत त्याची पत्नी सुनीता दिसली नाही. या व्हिडिओमध्ये गोविंदाला लग्नात एकटा पाहून लोकांनी सुनीतावर कमेंट्स केल्या होत्या. लोकांनी कमेंटमध्ये विचारले की गोविंदा त्याची पत्नी सुनीताला लग्नाला का घेऊन गेला नाही.

https://youtube.com/shorts/n-PQY9uh9ks?si=KDDFHZtS0JRqUczC

​मामाची रॉयल एंट्री

आरती सिंहने २५ एप्रिल रोजी दीपक चौहानसोबत लग्न केले. यावेळी गोविंदाने देखील उपस्थिती दाखावली. त्याच्या एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो 'बिग बॉस 13' फेम हिंदुस्थानी भाऊला मिठी मारताना दिसत आहे. यावेळी गोविंदाने वेलवेटचा सूट कॅरी केला आहे.

यावेळी त्यांने व्हाईट रंगाच्या शर्टसोबत त्याने हा लुक पूर्ण केला. तुम्ही देखील असा लुक कॅरी करू शकता. गोविंदा आणि कृष्णा यांच्यात भांडण झाले होते. यानंतर दोघेही बराच वेळ एकमेकांशी बोलले नव्हते. मात्र, गेल्या वर्षी हा वाद संपला. असे म्हटले तर ते वावगं ठरणार नाही.


सम्बन्धित सामग्री