मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम प्रकटले

अयोध्या, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार अर्थात मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीरामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. राम मंदिरात प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे. यामुळे यंदा अयोध्येसह संपूर्ण देशात रामनवमी […]

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम प्रकटले

अयोध्या, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार अर्थात मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीरामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. राम मंदिरात प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे. यामुळे यंदा अयोध्येसह संपूर्ण देशात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. दुपारी बारा वाजता सूर्य डोक्यावर आल्यावर रामजन्माचा सोहळा साजरा करण्यास सुरुवात झाली.

अयोध्येत राम मंदिरात सूर्यतिलक सोहळा पार पडला. सूर्यकिरण प्रभू रामाच्या मूर्तीवर पडले आणि मंदिराचा गाभारा अर्थात गर्भगृह सूर्यप्रकाशाने उजळले. यानंतर प्रभू रामाची विशेष पूजा करण्यात आली. प्रभू रामाला ओवाळण्यात आले. रामनवमीनिमित्त देशभर रामजन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. निवडणूक प्रचाराच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानात टॅबवर प्रभू रामाच्या सूर्यतिलक सोहळ्याचा व्हिडीओ बघितला. अनवाणी होत पंतप्रधान मोदींनी सूर्यतिलक सोहळ्याचा व्हिडीओ बघितला. हा सोहवा बघताना पंतप्रधान मोदी भावूक झाले होते.

रामजन्माची कथा

त्रेतायुगात रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने प्रभू रामाच्या रुपाने अवतार घेतला. चैत्र शुक्ल नवमीला राणी कौशल्येच्या पोटी राजा दशरथाच्या घरी प्रभू रामाचा जन्म झाला. पुढे रामाने दुष्टांचा अर्थात राक्षसांचा संहार केला. रावणाचा वध केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number