गायिका अनुराधा पौडवाल भाजपात

नवी दिल्ली, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : गायिका अनुराधा पौडवाल यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. अनुराधा पौडवाल यांनी दुपारी दिल्लीच्या भाजपा कार्यालयात येऊन पक्षप्रवेश केला. केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे, त्याचवेळी आचारसंहिता लागू होणार आहे. याच्या काही तास आधी अनुराधा पौडवाल यांनी भाजपात प्रवेश […]

गायिका अनुराधा पौडवाल भाजपात

नवी दिल्ली, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : गायिका अनुराधा पौडवाल यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. अनुराधा पौडवाल यांनी दुपारी दिल्लीच्या भाजपा कार्यालयात येऊन पक्षप्रवेश केला. केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे, त्याचवेळी आचारसंहिता लागू होणार आहे. याच्या काही तास आधी अनुराधा पौडवाल यांनी भाजपात प्रवेश केला.

कोण आहेत अनुराधा पौडवाल ?

अनुराधा पौडवाल गायिका आहेत. भक्तीगीतांसाठी त्या ९० च्या दशकात लोकप्रिय झाल्या. अनुराधा पौडवाल आता ६९ वर्षांच्या आहेत. त्यांनी १९६९ मध्ये अरुण पौडवाल यांच्याशी लग्न केले. अरुण पौडवाल हे एसडी बर्मन यांचे सहकारी आणि म्युझिक कंपोझर होते. पौडवाल दांपत्याला दोन मुले झाली, आदित्य आणि कविता. आदित्यचे काही वर्षांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले. याआधी १९९१ मध्ये अरुण पौडवाल यांचे निधन झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number