गगनयान मोहिमेसाठी अंतराळवीरांच्या नावांची घोषणा

तिरुअनंतपुरम, २७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड झाली आहे. या अंतराळवीरांच्या नावांची घोषणा मंगळवार २७ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गगनयान मोहिमेसाठी निवड झालेल्या अंतराळवीरांचा सत्कार करण्यात आला. गगनयान मोहिमेसाठी निवड झालेले अंतराळवीरग्रुप कॅप्टन प्रशांत बाळकृष्णन नायरग्रुप कॅप्टन अजित कृष्णनग्रुप कॅप्टन अंगद प्रतापविंग कमांडर शुभांशु […]

गगनयान मोहिमेसाठी अंतराळवीरांच्या नावांची घोषणा

तिरुअनंतपुरम, २७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड झाली आहे. या अंतराळवीरांच्या नावांची घोषणा मंगळवार २७ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गगनयान मोहिमेसाठी निवड झालेल्या अंतराळवीरांचा सत्कार करण्यात आला.

गगनयान मोहिमेसाठी निवड झालेले अंतराळवीर
ग्रुप कॅप्टन प्रशांत बाळकृष्णन नायर
ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन
ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप
विंग कमांडर शुभांशु शुक्ला

गगनयान मोहिमेसाठी निवड झालेले अंतराळवीर इस्रोच्या प्रकल्पासाठी नियमित सराव करून तयारी करतील. निवड झालेले चौघे भारताच्या वायुदलाचे अनुभवी वैमानिक आहेत. त्यांना लढाऊ विमान हाताळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. या वैमानिकांना रशियात तज्ज्ञांनी अंतराळ मोहिमेसाठी विशेष प्रशिक्षण दिले आहे. सध्या हे चौघे बंगळुरू येथील अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात सराव करत आहेत.

इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी शेकडो वैमानिकांमधून बारा जणांची निवड करण्यात आली. या बारा जणांमधून अंतराळवीर म्हणून चार जणांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या अंतराळवीरांना रशियात विशेष प्रशिक्षण देण्यात आले. सध्या ते भारतात मोहिमेची तयारी करत आहेत.

गगनयानच्या निमित्ताने पहिल्यांदाच भारताच्या मोहिमेतून चार भारतीय अंतराळात जाणार आहेत. याआधी रशियाच्या अंतराळ मोहिमेद्वारे स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा अंतराळात गेले होते. ते भारताचे पहिले आणि जगातले १३८ वे अंतराळवीर होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number