नवी दिल्ली, २६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : परंपरेनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. राज्यातील बारा नागरिकांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. घोषणेनुसार महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मभूषण आणि सहा जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मविभूषण (एकूण : ५)
१ माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (सार्वजनिक सेवा)
२ वैजयंतीमाला बाली (कला)
३ चिरंजिवी (कला)
४ पद्मा सुब्रमण्यम (कला)
५ बिंदेश्वर पाठक (समाजसेवा) मरणोत्तर
पद्मभूषण (एकूण : १७, महाराष्ट्रातून सहा)
१ हरमसजी कामा (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
२ अश्विनी मेहता (औषधी)
३ राम नाईक (सार्वजनिक सेवा)
४ राजदत्त (कला)
५ प्यारेलाल शर्मा (कला)
६ कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
पद्मश्री (एकूण : ११०, महाराष्ट्रातून सहा)
१ उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा, मल्लखांब प्रशिक्षक)
२ मनोहर डोळे (औषधी)
३ झहीर काझी (साहित्य, शिक्षण)
४ चंद्रशेखर महादेवराव मेश्राम (औषधी)
५ कल्पना मोरपरीया (व्यापार-उद्योग)
६ शंकरबाबा पापळकर (समाजसेवा)