तृणमूलच्या खासदाराने केली उपराष्ट्रपतींची नक्कल

नवी दिल्ली, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : संसदेतून १४१ खासदारांचे यंदाचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले. या खासदारांनी संसदेबाहेर सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. गांधी पुतळ्यापुढे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली. कल्याण बॅनर्जी नक्कल करत असताना त्या घटनेचा […]

तृणमूलच्या खासदाराने केली उपराष्ट्रपतींची नक्कल

नवी दिल्ली, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : संसदेतून १४१ खासदारांचे यंदाचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले. या खासदारांनी संसदेबाहेर सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. गांधी पुतळ्यापुढे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली. कल्याण बॅनर्जी नक्कल करत असताना त्या घटनेचा राहुल गांधी यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ तयार केला. या घटनेची माहिती मिळताच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी घडलेल्या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला. खासदारांनी त्यांची वागणूक सुधारणे अपेक्षित आहे, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले.

संसदेतून १४१ खासदारांचे निलंबन

विरोधकांची मागणी : संसदेतील घुसखोरी प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत आणि राज्यसभेत निवेदन द्यावे. घुसखोरीच्या मुद्यावर दोन्ही सभागृहात सविस्तर चर्चा करावी.

कारवाईचे कारण : मागणी करताना संसदीय शिस्तीचे उल्लंघन करणे

कारवाई : हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन

शुक्रवार १५ डिसेंबर २०२३ : लोकसभेतून १३ खासदारांचे निलंबन
शुक्रवार १५ डिसेंबर २०२३ : राज्यसभेतून तृणमूलच्या डेरेक ओ’ब्रायन यांचे निलंबन

सोमवार १८ डिसेंबर २०२३ : लोकसभेतून ३३ खासदारांचे निलंबन
सोमवार १८ डिसेंबर २०२३ : राज्यसभेतून ४५ खासदारांचे निलंबन

मंगळवार १९ डिसेंबर २०२३ : लोकसभेतून ४९ खासदारांचे निलंबन

शुक्रवार ते मंगळवार या काळात संसदेतून १४१ खासदारांचे निलंबन
राज्यसभेच्या ४६ आणि लोकसभेच्या ९५ खासदारांचे निलंबन

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number