न्यूयॉर्क, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : जगातील पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता जोखीम घोषणापत्रावर भारत आणि इतर २७ देशांसह युरोपियन युनियनने सही केली. कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त आहे पण या तंत्रज्ञानाशी संबंधित जोखमींवर संशोधन करून धोका कमी करण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. यासाठी भारत आणि इतर २७ देशांसह युरोपियन युनियनने कृत्रिम बुद्धिमत्ता जोखीम घोषणापत्रावर सही केली.
ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चिली, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, आयर्लंड, इस्रायल, इटली, जपान, केनिया, सौदी अरेबिया, नेदरलँड, नायजेरिया, फिलीपिन्स, कोरिया प्रजासत्ताक, रवांडा, सिंगापूर, स्पेन, स्वित्झर्लंड, तुर्कस्तान, युक्रेन, संयुक्त अरब आमिराती, इंग्लंड आणि उत्तर आयर्लंड, अमेरिका, युरोपियन युनियन यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता जोखीम घोषणापत्रावर सही केली.