भारत – पाकिस्तान सीमेवर शिवाजी महाराजांचा पुतळा

मुंबई, २० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : भारत – पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा राजभवन मुंबई येथून समारंभपूर्वक रवाना करण्यात आला. पुतळा जम्मू – काश्मीर येथील कुपवाडामध्ये उभारण्यात येईल. शिवरायांचा पुतळा मुंबईतून रवाना झाला त्यावेळी राज्यपाल बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या […]

भारत – पाकिस्तान सीमेवर शिवाजी महाराजांचा पुतळा

मुंबई, २० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : भारत – पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा राजभवन मुंबई येथून समारंभपूर्वक रवाना करण्यात आला. पुतळा जम्मू – काश्मीर येथील कुपवाडामध्ये उभारण्यात येईल. शिवरायांचा पुतळा मुंबईतून रवाना झाला त्यावेळी राज्यपाल बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.

शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी शिवकालीन गडकिल्ल्यांचे फोर्ट सर्किट तयार करावे तसेच पर्यटकांना सर्व किल्ल्यांची माहिती देणारे पुस्तक तयार करावे, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी दिली. ते शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मुंबईतून जम्मू काश्मीरला रवाना करण्यासाठी आयोजिलेल्या सोहळ्यात बोलत होते.

‘आम्ही पुणेकर फाउंडेशन’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेला अश्वारूढ पुतळा कुपवाडा येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटला स्थापनेसाठी देण्यात येणार आहे.

शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी राजमहाल न बांधता राज्य रक्षणासाठी गडकिल्ले बांधले. महाराजांच्या नावातच शक्ती आहे. महाराजांचे नाव घेऊन आपण प्रतापगडावर साडेपाचशे पायऱ्या चढून गेलो, असे राज्यपालांनी सांगितले.

यावर्षी ४ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर भारतीय नौदल दिनाचा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे नमूद करून शिवाजी महाराजांची दृष्टी त्यांच्या काळाच्या फार पुढे होती. जुलमी मुघल राजवटीतून राज्य मुक्त करून समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्याचे स्वप्न महाराजांनी पाहिले, असे राज्यपालांनी सांगितले.

सन २०३६ मध्ये भारतात ऑलिम्पिक आयोजित करण्याच्या दृष्टीने देश प्रयत्न करणार आहे, असे सांगून राज्यातील विद्यार्थ्यांना तरुणांना आतापासून विविध खेळांमध्ये तयार करुन देशासाठी अधिकाधिक पदके मिळविण्याचा राज्याने संकल्प करावा, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार

लंडन येथे लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. शिवाजी महाराजांचे जीवनकार्य लोकांना समजावे या करीत २० भाषांमधून महाराजांचे चरित्र ऐकण्याची सोय केली जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली. ब्रेल लिपीतून देखील शिवाजी महाराजांचा इतिहास मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी महाराजांचा कुपवाडा येथील अश्वारूढ पुतळा देशात ऊर्जा निर्माण करण्याचे काम करेल असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number