चंदेरी पापलेटला राज्य मासा दर्जा

मुंबई, ५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : खळाळत्या समुद्रात आढळणारा चंदेरी पापलेट हा मासाप्रेमींसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. तव्यावर तळलेले आणि मसाला भरलेले पापलेट फ्राय… आले, मिरची आणि लसूण यांच्या वाटणाचा वापर करून तयार केलेले पापलेटचे कालवण… ओले खोबरे, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता यांचे मिश्रण भरून तयार केलेले भरलेले पापलेट असे पापलेटचे वेगवेगळे पदार्थ खवय्यांसाठी जिभेचे चोचले पुरवण्याची […]

चंदेरी पापलेटला राज्य मासा दर्जा

मुंबई, ५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : खळाळत्या समुद्रात आढळणारा चंदेरी पापलेट हा मासाप्रेमींसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. तव्यावर तळलेले आणि मसाला भरलेले पापलेट फ्राय… आले, मिरची आणि लसूण यांच्या वाटणाचा वापर करून तयार केलेले पापलेटचे कालवण… ओले खोबरे, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता यांचे मिश्रण भरून तयार केलेले भरलेले पापलेट असे पापलेटचे वेगवेगळे पदार्थ खवय्यांसाठी जिभेचे चोचले पुरवण्याची हमी आहेत. असा हा मासाप्रेमींना खूष करणारा मासा आता राज्य मासा म्हणून ओळखला जाणारा. चंदेरी पापलेट माशाला राज्य मासा हा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने ही घोषणा केली आहे.

यशवंतराव चव्हाण केंद्र येथे किसान क्रेडिट कार्डच्या राष्ट्रीय परिषदेत मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. याआधी राज्य शासनाने शेकरू या प्राण्याला राज्य प्राणी हा दर्जा दिला आहे तसेच हरियाल या पक्ष्याला राज्य पक्षी हा दर्जा दिला आहे.

सिल्वर पॉम्फ्रेट अर्थात चंदेरी पापलेट या माशाच्या उत्पादनात वेगाने घट होत आहे. यामुळे चंदेरी पापलेट माशाच्या प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी या माशाला राज्य मासा हा दर्जा देण्यात आला आहे. चंदेरी पापलेटला राज्य मासा हा दर्जा मिळावा यासाठी पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील मच्छिमार संस्था आग्रही होत्या. मच्छिमार बांधवांच्या या मागणीची दखल घेऊन राज्य शासनाने चंदेरी पापलेटला राज्य मासा हा दर्जा दिला आहे.

पापलेट हा महाराष्ट्रातून सर्वाधिक निर्यात होणारा मासा
पापलेटच्या निर्यातीतून राज्याला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते
महाराष्ट्रात १९८० पासून पापलेटच्या उत्पादनात घट
राज्य मासा झाल्यामुळे पापलेट जतनास मदत होणार
सिल्व्हर पॉम्फ्रेट माशाला स्थानिक पातळीवर पापलेट किंवा सरंगा म्हणून ओळखतात
पालघर जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात पापलेट मोठ्या प्रमाणात आढळतात
पालघरचे सागरी क्षेत्र पापलेटसाठी गोल्डन बेल्ट
ऑक्टोबर २०२२ मध्ये चंदेरी पापलेट माशाचे चित्र असलेले टपाल तिकीट प्रसिद्ध

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number