नगरचे नामकरण, पडळकरांची भविष्यवाणी

केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराला शुक्रवारी मंजुरी दिली. गेल्या पंचवीस वर्षांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रश्न प्रलंबित होता. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी सातत्याने होत होती, अखेर केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचे नामांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. अशाप्रकारे औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद आता धाराशिव म्हणून ओळखले जाणार आहे. यादरम्यान आता महाराष्ट्रातील आणखी […]

नगरचे नामकरण, पडळकरांची भविष्यवाणी

केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराला शुक्रवारी मंजुरी दिली. गेल्या पंचवीस वर्षांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रश्न प्रलंबित होता. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी सातत्याने होत होती, अखेर केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचे नामांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. अशाप्रकारे औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद आता धाराशिव म्हणून ओळखले जाणार आहे.

यादरम्यान आता महाराष्ट्रातील आणखी एका शहराचं नाव बदलणार असल्याची चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक ट्विट केलं आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहदनगरचं नामांतरण होणार असल्याचं बोललं जात आहे. अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली होणार, असं ट्विट भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. पडळकर यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, पडळकर यांनी याआधी देखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ करा, अशी मागणी केली होती. त्यांनी पत्र लिहून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. अहमदनगरचंही नामांतर व्हावं अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अहिल्यानगर असं अहमदनगरचं नामांतर करण्याची मागणी असून आता ही मागणीही पूर्ण होणार का हे पाहावं लागेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number