मनसे ‘या’ पक्षाला देणार पाठिंबा

26 फेब्रुवारीला पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येईल. याचा निकाल 2 मार्चला जाहीर करण्यात येईल. या निवडणुकांसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निवडणुकीत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश येईपर्यंत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. पण आता राज ठाकरे यांच्याकडून पुढील आदेश देण्यात […]

मनसे ‘या’ पक्षाला देणार पाठिंबा

26 फेब्रुवारीला पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येईल. याचा निकाल 2 मार्चला जाहीर करण्यात येईल. या निवडणुकांसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निवडणुकीत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश येईपर्यंत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती.

पण आता राज ठाकरे यांच्याकडून पुढील आदेश देण्यात आले आहेत.मनसेने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला मदत करणार असल्याचे घोषित केले आहे. मनसेचे नेते अनिल शिदोरे आणि बाबू वागसकर यांनी ही माहिती दिली असून चिंचवड आणि कसबा या दोन्ही ठिकाणी मनसेची हीच भूमिका राहणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणार असली तरी मनसेचे कार्यकर्ते अथवा पदाधिकारी हे प्रचारात सहभागी होणार नाही, अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागस्कर यांच्याकडून देण्यात आली आहे. मात्र, मतदानाच्या पातळीवर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना संपूर्ण पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे.तसेच या निवडणुकीमध्ये भाजपला मदत करण्याचा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला असल्याची माहिती मनसेचे नेत्यांनी दिली आहे.

पुण्यातील स्थानिक नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये झालेल्या चर्चेत राज ठाकरे यांनी आपला कल हिंदुत्व आणि विकासाच्या बाजूने असल्याचे यावेळी स्पष्ट केले. यावेळी वागस्कर यांनी मनसेचा पाठिंबा भाजपला असल्याचे जाहीर केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number